ब्रह्मगिरी सायक्लोट्रेकेथॉन २०२५
रॉयल रायडर्स ची ब्रम्हगिरी सायकल परिक्रमा उत्साहात संपन्न 125 रायडर्स चा सहभाग
About The Ride - In Just ₹0/-
जमण्याची वेळ- स 5.45 प्रस्थान - स 6.00 वा गोल्फ क्लब ग्राउंड गेट, तरण तलाव समोर, त्रंबक रोड, नाशिक.) महत्त्वाची सूचना- जमण्याची व प्रस्थान वेळ दिलेली आहे. आपण सर्वांनीच वेळ पाळणे गरजेचे आहे. जितका उशीर होतो तितके पुढील नियोजन बिघडते हे लक्षात ठेवावे. मार्ग---- हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गेट (गोल्फ क्लब) , त्रंबक रोड➡ABBसर्कल➡सपकाळ नॉलेज➡पेगलवाडी फाटा - हायड्रेशन 1 ➡सामुंडी - हायड्रेशन 2 ➡त्रंबकेश्वर - ब्रेकफास्ट राईड समाप्त सोबत रेनकोट, पाणी बॉटल, हेल्मेट, पंक्चर किट घ्यावे. ड्रेस कोड- रॉयल येलो जर्सी अथवा रॉयल राईड जर्सी जय भवानी. रॉयल रायडर्स सायकलिंग ग्रुपच्या वतीने रविवार दि 1 सप्टेंबर 2024 रोजी ब्रम्हगिरी सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. सकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून फ्लॅग ऑफ होऊन सुरुवात झाली. संदीप फाउंडेशन, पेगलवाडी, सामुंडी फाटा येथे हायड्रेशन तर त्रम्बकेश्वर येथे सर्व रायडर्स करिता अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली होती. रिमझिम पावसाच्या सरी झेलत निसर्गाच्या सानिध्यात फेरीचा आनंद सायकलिस्ट ने घेतला. काही ठिकाणी तीव्र चढ तर काही ठिकाणी उतारावरील तीव्र वळण सायकलिस्ट ची परीक्षा घेत होते. गौतम ऋषी डोंगर चढताना 250 पायऱ्या सायकल खांद्यावर धरून सायकलिस्टने आपापली सायकल वरती नेली तर उतरताना 150 पायऱ्या याच पध्दतीने सायकल खाली आणली. वन अधिकारी श्री अरुण निंबेकर साहेब व Secretary सहकाऱ्यांनी वन संरक्षण व पर्यावरण संवर्धन याबाबत रायडर्स चे उद्बोधन केले. या परिक्रमेत नाशिक शहरासह निफाड, येवला, वैजापूर, संगमनेर, घोटी येथील 125 सायकलिस्ट ने सहभाग घेतला. या ब्रम्हगिरी सायकल परिक्रमेच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ कोटमे, संदीप दराडे, राजाभाऊ राऊत, वन अधिकारी अशोक काळे साहेब, बाळासाहेब भगुरे, विनोद बनकर, विक्रम डेरले, प्रशांत गायकवाड, रोहित मढवई आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Event Schedule
| Day | Route | Distance | Time |
|---|---|---|---|
| 03-Aug-2025 | हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गेट (गोल्फ क्लब) , त्रंबक रोड➡ABBसर्कल➡सपकाळ नॉलेज➡पेगलवाडी फाटा | 90 | 06:00:00 AM |
Rules & Regulations
- .
Our Partners
Why Participate?
सायकलिंग + ट्रेकिंग ती पण निसर्गाच्या सानिध्यात रॉयल रायडर्सच्या सोबतीने