भंडारदरा क्लासिक

निसर्गाच्या कुशीत कर्तृत्वाची अनोखी सायकल मोहीम

Challenger Main Image

About The Challenge - In Just ₹1,499/-

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भंडारदरा धरण हे निसर्गरम्य स्थळ साहसी सायकलस्वारांसाठी एक अनोखा अनुभव देणारे ठिकाण आहे. उंच डोंगररांगा, नागमोडी घाटरस्ते, धुक्याची चादर, निसर्गनिर्मित धबधबे आणि शांत जलाशय, या सर्वांच्या साक्षीने होणारी सायकल परिक्रमा म्हणजे खऱ्या अर्थाने शरीर व मनाचा उत्सवच आहे. भंडारदरा परिसर हा सह्याद्रीच्या रौद्र आणि रम्य सौंदर्याचा संगम आहे. पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेले डोंगर, रस्त्याच्या कडेला कोसळणारे असंख्य धबधबे आणि स्वच्छ, प्रसन्न हवा सायकलिंगसाठी आदर्श वातावरण निर्माण करतात. घाटातील चढ-उतार रायडर्सच्या क्षमतेची परीक्षा घेतात, तर उतारावरील वेग रोमांचाची अनुभूती देतो. या परिसरात ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेली अनेक स्थळे आहेत. डौलाने उभा असलेला रतनगड किल्ला, भव्य असा हरिश्चंद्रगड, शांत आणि प्रभावी आजोबा पर्वत, तसेच उंचच उंच तारामती शिखर या परिक्रमेचे वैभव वाढवतात. याच सह्याद्रीत दुर्गवैभवाची ओळख असलेले अलंग किल्ला, मदन किल्ला आणि कुलंग किल्ला (AMK त्रिकूट) तसेच कळसुबाई शिखर (महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर), घनचक्कर दुर्ग, पाबरगड, भैरवगड (शिरपुंजे), भैरवगड (मोरोशी परिसर) हे साहसप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरतात. या परिसरात पवित्र प्रवरा नदीचे उगमस्थान आहे, ज्यामुळे या भूमीला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावणारी ही नदी संपूर्ण परिसराला जीवनदायिनी ठरते आणि भंडारदराच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिक भर घालते. निसर्गाचा चमत्कार असलेली आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची लांबीची सांधण दरी, डोळे भरून सौंदर्य साठवावे अशी लव्हाळवाडी, दोन्ही बाजूंनी पसरलेले भंडारदरा धरणाचे शांत बॅकवॉटर आणि मधून जाणारा पर्यटकांना खुणावणारा रस्तावजा पूल हे दृश्य मन मोहून टाकणारे आहे. तसेच या परिसरातील प्राचीन अमृतेश्वर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्यकलेचे सुंदर उदाहरण असून अध्यात्म आणि इतिहासाचा संगम घडवते. याशिवाय अंब्रेला वॉटरफॉल, नेकलेस वॉटरफॉल, न्हाणी वॉटरफॉल आणि पावसाळ्यात सजीव होणारे असंख्य धबधबे या भागाच्या सौंदर्यात चार चांद लावतात. तरुणाईला वेड लावणारे आणि प्रत्येकाला भुरळ पाडणारे हे अप्रतिम दृश्य अनुभवताना वेळ कसा जातो हे कळतही नाही. सायकल परिक्रमा ही केवळ एक क्रीडा उपक्रम नसून, ती आत्मविश्वास, शिस्त आणि संघभावनेचा धडा देणारी यात्रा असते. प्रत्येक चढ हा नव्या जिद्दीचा अनुभव असतो आणि प्रत्येक शिखर सर केल्यावर मिळणारा आनंद अविस्मरणीय असतो. निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःशी संवाद साधण्याची ही एक सुंदर संधी आहे. भंडारदरा धरण परिसरातील सायकल परिक्रमा म्हणजे धाडस, शौर्य, निसर्गप्रेम आणि सह्याद्रीच्या वैभवाचा संगम. ????‍♂️ ''प्रत्येक पेडल आणि घामाचा थेंब तुमच्यासोबत बोलेल; प्रत्येक वळणावर जिद्दीची नवी कथा उलगडेल." अनुभव घ्या स्वातंत्र्याचा, आणि सह्याद्रीच्या साक्षीने रॉयल परिवारासोबत स्वतःची साहसगाथा लिहा! हे सर्व अनुभवण्यासाठी आपण आपल्या मित्र परिवारासह सहभागी व्हा… शिस्त पाळत, सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि एकमेकांच्या साथीत हा प्रवास अविस्मरणीय बनवूया!

Terms & Conditions

  • फक्त मार्यादित १०० जागा
  • राईड starting Point पर्यंत येण्याजाण्याची सोय रायडर ने स्वतः करायची आहे
  • सायकल नेण्या आणण्यासाठी नाशिक ते भंडारदरा ते नाशिक सुविधा असेल.
  • नावनोंदणी रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
  • रस्त्याने सायकलिंग करताना नेहमी डाव्या बाजूने चालावे, आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • आपण स्पर्धेसाठी नव्हे तर सहलीसाठी जात आहोत, हे नेहमी लक्षात ठेवावे. राईड दरम्यान ग्रुपसोबतच राहावे.
  • टॅग अनिवार्य आहे,राईड सुरू करण्यापूर्वी टॅग असल्याची खात्री करून घ्यावी.
Why Join This Challenge?

Test your limits and push your boundaries

Join a community of passionate riders

Create unforgettable memories

Experience the thrill of adventure